सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

By Admin | Updated: October 17, 2014 00:10 IST2014-10-16T22:52:30+5:302014-10-17T00:10:50+5:30

सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

The youth wounded in the Arms movement in Satpur | सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

नाशिक : सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनीमध्ये एका युवकावर अज्ञात सुमारे वीस जणांच्या टोळक्याने चाकुहल्ला केल्याची घटना आज (दि.१६) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तरीदेखील गंगापूररोड पोलीस ठाण्याला कुठलीही माहिती घटनास्थळावरून मिळू शकली नाही हे विशेष.
चाकुहल्लयात गंभीर जखमी झालेल्या विनोद विलास जाधव (२३, रा. शिवाजीनगर, सातपुर) याला नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आणले. त्यानंतर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात माहिती कळविली. तोपर्यंत संबंधित पोलीस ठाणे व त्यांचे बीट मार्शल आणि गोपनिय विभाग अनभिज्ञच होते. त्यामुळे उशिरापर्यंत कुठलीही नोंद येथील पोलीस ठाण्याच्या डायरीवर होऊ शकली नव्हती. चाकु हल्लयात गंभीर जखमी झालेल्या जाधव याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे.

Web Title: The youth wounded in the Arms movement in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.