लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून खेटा मारणाऱ्या युवकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, नोकरीचे नियुक्तिपत्र देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु आचारसंहिता मागे होऊन आठवड्याचा कालावधी उलटल्याने प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो बेरोजगार युवकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने माघारी फिरावे लागले.
जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालकाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी शेकडो युवक पाठपुरावा करत असून, त्यांची संख्या जवळपास २७६च्या आसपास आहे. त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पावले उचलली आहेत. साधारणत: दीडशे युवकांचे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु मार्च महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही प्रक्रिया मागे पडली. अडीच ते तीन महिने त्यावर काहीच हालचाल होऊ शकली नसली तरी, या युवकांनी आपली मागणी रेटून धरली असता, प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्याच आठवड्यात नियुक्तीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले. या भरतीत ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, तांत्रिक असे अनेक पदे असून, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ११० युवकांना नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मकता प्रशासनाने दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून, ३१ मेपर्यंत नियुक्तीची पत्रे मिळतील असा अंदाज या युवकांनी बांधला होता. परंतु तसे काही न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो युवक-युवती जिल्हा परिषदेत जमली होती. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या समुपदेशाने बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दिवसभर त्यात व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट पाहूनही या अधिकाºयांची भेट न झाल्याने अखेर या युवकांनी माघारी फिरणे पसंत केले.