मोटार उलटल्याने युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST2021-02-09T04:16:56+5:302021-02-09T04:16:56+5:30

पाथर्डीगाव राजवाडा येथील संतोष मुनजा वाकळे (२४) हा युवक शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच्या घराकडून वडनेरगेटच्या दिशेने मार्गस्थ ...

The youth was killed when the car overturned | मोटार उलटल्याने युवक ठार

मोटार उलटल्याने युवक ठार

पाथर्डीगाव राजवाडा येथील संतोष मुनजा वाकळे (२४) हा युवक शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच्या घराकडून वडनेरगेटच्या दिशेने मार्गस्थ होत होता. रस्त्यात अचानक त्याची गाडी उलटल्याने तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

नाशिकरोड : उपनगर येथील अप्पू चौकातील नवीन चाळ येथे राहणारे वयोवृध्द हिरामण किशन जाधव (७१) यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरामागील शौचालयात लाकडी दांड्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

लोखंडी पाईपने मारहाण करत घातला धिंगाणा

नाशिकरोड : परिसरात अंडा-भुर्जीच्या हातगाडीवर उधारीच्या पैशांवरून एका युवकास तिघांनी मिळून लोखंडी पाईपने मारहाण करत जखमी करून धिंगाणा घातल्याची घटना घडली.

पळसे कारखानारोड येथील शरद उर्फ गोरक्षनाथ गायधनी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अंडा भुर्जीच्या उधारीच्या पैशांवरून संशयित संतोष आनंदा गायधनी, समाधान आनंदा गायधनी, आनंदा गायधनी (रा. नासाका कारखानारोड, पळसे) यांनी शरदला शिवीगाळ करून मारहाण केली. डोक्यात पाईप मारुन जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The youth was killed when the car overturned