तरुणाकडून एकतर्फी प्रेमातून युवतीवर वार
By Admin | Updated: September 27, 2014 00:09 IST2014-09-27T00:09:04+5:302014-09-27T00:09:20+5:30
तरुणाकडून एकतर्फी प्रेमातून युवतीवर वार

तरुणाकडून एकतर्फी प्रेमातून युवतीवर वार
नाशिक : एकतर्फी प्रेमातून एरंडवाडी येथील तरुणाने मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना बेलगाव ढगा येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीनंतर या तरुणाने स्वत:च्या पोटात चाकूने वार करून घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला़ या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास दीपक बाळू रोगटे (२३, एरंडवाडी, पेठ फाटा, पंचवटी) या तरुणाने एकतर्फी प्रेमातून बेलगाव ढगा येथे आईकडे राहणारी दीपाली रामचंद्र जाधव (१८) या तरुणीवर चाकूने वार केले़ त्यामध्ये या तरुणीच्या मांडीवर व हाताला मोठी जखम झाली़ मुलीवर चाकूने वार केल्याची माहिती बेलगाव ढगा येथील नागरिकांना मिळताच तेथे जमलेल्या जमावाने रोगटेला बेदम मारहाण केली़
नागरिकांच्या मारहाणीनंतर रोगटेने स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यात कळविली असता पोलीस हवालदार दराडे हे घटनास्थळी पोहोचले.