युवकांनी घेतली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:19+5:302021-07-30T04:14:19+5:30
ग्रामस्थांकडून परिसर सुशोभिकरणाची कामे गेल्या चार वर्षांपासून वेगाने केली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांनी झाडे लावून ...

युवकांनी घेतली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी
ग्रामस्थांकडून परिसर सुशोभिकरणाची कामे गेल्या चार वर्षांपासून वेगाने केली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांनी झाडे लावून वाढदिवस साजरा केला. माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, माजी उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच रमेश आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बुरसे, उपसरपंच नवनाथ आव्हाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कचेश्वर आव्हाड, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, अजय कडाळी, अनिल आव्हाड, प्रभाकर दराडे, बाळू आव्हाड, अर्जुन आव्हाड, अशोक काळे, एस. पी. आव्हाड, समाधान कांगणे, सुभाष नाना आव्हाड, संदीप आव्हाड, सोमनाथ आव्हाड, राजू सोमानी, ग्रामपंचायत सदस्य कडाळे, वृक्षमित्र अजय काळे, अर्जुन आव्हाड, नंदू आव्हाड, श्याम गीते, ग्रामपंचायतीचे लिपिक आव्हाड, वैभव शहाणे, अजित निरगुडे, मनु आव्हाड, रामदास आव्हाड, अकॅडमीचे सराव करणारे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
इन्फो...
निगा राखण्याचा मानस
गावातील युवक व्यायामासाठी दररोज धुळवड फाट्यापर्यंत जातात. हे युवक उन्हाळ्यातही झाडांचे जतन करणार आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. भविष्यात आणखी झाडे लावून धूळवड फाटा हिरवागार करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला.
इन्फशे...
सह्याद्री युवा मंचकडून संरक्षक जाळ्या
शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या. सह्याद्री युवा मंच वृक्ष संवर्धनासाठी तीन वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. तालुक्यातील सात गावांत आत्तापर्यंत चार हजार झाडे लावण्यात आली आहेत. यातील ९० टक्के झाडे जगविण्यातही यश आले आहे. वृक्षारोपण होताच त्याला संरक्षक जाळी बसविणे व पाण्याची सुविधा करणे, ही जबाबदारीही मंचच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे.
फोटो - २९ दापूर १
दापूर येथे वृक्षारोपण करतांना माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.
290721\29nsk_2_29072021_13.jpg
दापूर येथे वृक्षारोपण करतांना माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.