तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Updated: March 31, 2017 01:13 IST2017-03-31T01:13:38+5:302017-03-31T01:13:57+5:30
चांदवड : तालुक्यातील साळसाणे येथील संदीप उत्तम शिंदे (३३) तरुणाचा नाशिकच्या खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
चांदवड : तालुक्यातील साळसाणे येथील संदीप उत्तम शिंदे (३३) तरुणाचा नाशिकच्या खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. संदीप शिंदे यास स्वाइन फ्लू आजाराची लक्षणे दिसल्याने त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दि. २२ रोजी दाखल केले होते. दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे त्याच्यावर उपचार करताना अडचणी येत होत्या. त्यांच्या नातलगांनी संदीप शिंदे यास नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी (दि. ३०) त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.