शांतीनगर खदाणीत युवकाची आत्महत्त्या

By Admin | Updated: December 22, 2015 23:36 IST2015-12-22T23:35:44+5:302015-12-22T23:36:33+5:30

शांतीनगर खदाणीत युवकाची आत्महत्त्या

Youth suicide in Shantinagar Khatnya | शांतीनगर खदाणीत युवकाची आत्महत्त्या

शांतीनगर खदाणीत युवकाची आत्महत्त्या

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील शांतीनगर परिसरातील खदाणीत उडी घेऊन एका अठरा वर्षीय युवकाने आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़२०) रात्रीच्या सुमारास घडली आहे़
मयत युवकाचे नाव गुरुदेव गजराज साळवे (शांतीनगर, डोंगरबाबा चौक, अंबड) असे आहे़ डोंगर उतारावरून खदाणीत उडी घेतल्याने साळवेला जबर मार लागला होता़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़
दरम्यान, त्याच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Youth suicide in Shantinagar Khatnya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.