रामवाडीत युवकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 30, 2016 00:43 IST2016-07-30T00:40:09+5:302016-07-30T00:43:14+5:30
रामवाडीत युवकाची आत्महत्त्या

रामवाडीत युवकाची आत्महत्त्या
नाशिक : पंचवटीतील रामवाडी परिसरातील तळेनगर येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
रामवाडीतील तळेनगर येथे राहणारा २१ वर्षीय युवक सागर रमेश शिंदे या युवकाने राहत्या घरी छतास ओढणीने गळफास लावून आत्महत्त्या केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)