विषारी औषध सेवनाने युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: June 23, 2017 16:37 IST2017-06-23T16:37:09+5:302017-06-23T16:37:09+5:30
राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पेठरोडवरील महात्मा फुलेनगरच्या बावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) घडली़.

विषारी औषध सेवनाने युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पेठरोडवरील महात्मा फुलेनगरच्या बावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) घडली़ दीपक जगन सापरे (२२, रा. महात्मा फुलेनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास दीपकने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.