सोशल मीडियाच्या आभासी जगात अडकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 PM2021-02-20T17:51:56+5:302021-02-20T17:53:16+5:30

सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस‌्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.

Youth stuck in the virtual world of social media | सोशल मीडियाच्या आभासी जगात अडकली तरुणाई

सोशल मीडियाच्या आभासी जगात अडकली तरुणाई

googlenewsNext
ठळक मुद्देधक्कादायक : लाईक्‍स, कमेंट्‌स अन्‌ स्टेटसचा खेळ ठरतोय जीवघेणा

सायखेडा : सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंटस‌्, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.

साधारणत: तीन बाय सहा इंचच्या मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व, संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली तरी हल्ली बहुसंख्य त्यातच आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. ही बाब मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या मोबाईल वापरकर्ते रुग्णांच्या संख्येवरुन दिसुन येते. बहुतांश युजर्संचा सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल दिसतो. ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणीची गरज असते. त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशिलता क्षीण होण्याची भिती सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे वाढते. युजर्सने एखादी पोस्ट टाकली तर त्यावर सोशल मीडियात कमेंट, लाईक्‍स याला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे ही धडपड तरुणाईत आहे.
त्यासाठी सोशल मीडियाचा शॉर्टकट घेतले जात आहेत. परंतु कमी लाईक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपण, निराशा असे परिणाम वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

असेही एक जग
त्याची व तिची फेसबुकवर ओळख झाली. नंतर संपर्क वाढला. प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ती स्वप्नात जगत होती. ती त्याचाच विचार करीत होती. तिच्याशी त्याने शरीरसंबंधही प्रस्थापित केले; परंतु प्रत्यक्षात मात्र तिला ऐनवेळी दगाफटका दिला आणि तिचे स्वप्न उद्‌वस्त केले. फेसलेस चॅट आणि आभासी जीवन जगण्यामुळे ही वेळ अनेकांवर येत आहे.

टीक टॉक असो वा इंन्स्ट्राग्राम की फेसबुक या सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली तरुणाई विविध व्हिडीओ, सेल्फी अपलोड करीत आहेत. धोक्‍याच्या स्थळी जाऊन जीव आणखीनच धोक्‍यात घालून व्हिडिओ कॉलिंग, स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. व्हिडिओ चित्रण करून अपलोड ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त प्रसिद्ध होऊ अशी भावनाही युजर्संची आहे. या आभासी जगातही काहीजणांचे जीव गेल्याची उदाहरणे आहेत. तरुणांने प्रसिद्धी साठी असे स्टंट करू नये.
- आशिष अडसूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायखेडा.

र्व्हच्युअल लाईफपेक्षा सोशल लाईफ जगण्याची गरज आहे. स्वमग्न नव्हे अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. तरुणांनी मोबाईल मधील गेम्स खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे, यामुळे तरुणाचा चिडचिडेपणा दूर होते. त्याच बरोबर शरीर मजबूत होते.
- शंकर सांगळे, कब्बड्डी प्रशिक्षक, निफाड.

काय म्हणतात तज्ज्ञ
माणसांचा माणसांशी प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. परिणामी, व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढत आहे. सोशल मीडियात वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्‍स, कमेंट, व्ह्युव्हज या गोष्टी महत्वाच्या वाटु लागल्या आहेत. आनंद म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी असाच समज वाढत आहे. त्यातून व्यक्ती स्वत:च स्वत:चे आभासी विश्‍व तयार करुन त्यात रममान होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्यक्तींचे सातत्य राखण्याची क्षमता व सहनशिलता कमी होत जाते.
- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल, चांदोरी.

 

Web Title: Youth stuck in the virtual world of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.