चांदवडला शनिवारी युवा कौशल्य मेळावा

By Admin | Updated: July 14, 2017 00:10 IST2017-07-14T00:02:24+5:302017-07-14T00:10:50+5:30

चांदवडला शनिवारी युवा कौशल्य मेळावा

Youth Skills Fair in Chandwad on Saturday | चांदवडला शनिवारी युवा कौशल्य मेळावा

चांदवडला शनिवारी युवा कौशल्य मेळावा


लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : जागतिक कौशल्य दिनानिमित चांदवड येथील शासकीय आय.टी.आय व धनलक्ष्मी नर्सिंग विद्यालय, स्वामिनी इन्फोटेक, युनिकोर्ण कॉम्युटरच्या माध्यमातून युवा कौशल्य मेळाव्याचे आयोजन शनिवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय आय.टी.आय. येथे आयोजित केले आहे.
दिंडोरीत चार विद्यार्थी बेपत्ता
दिंडोरी : येथील मविप्र जनता इंग्लीश स्कूलचे इयत्ता ९ वीत शिकणारे चार विद्यार्थी शाळेत जातो असे सांगून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दीपक कडाळे, कुलदीप देशमुख, जिवन बल्हाळ, अमोल सुदाम चौधरी हे दिं. १३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले. शाळा सुटल्यानंतर मुले घरी परतली नाही म्हणून पालकांनी शोधा -शोध सुरू केली असता चारही मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले. राञी उशीरा दिंडोरी पोलिसांना खबर देण्यात आली आहे.

Web Title: Youth Skills Fair in Chandwad on Saturday