युवा कौशल्य सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:21 IST2018-07-16T00:20:48+5:302018-07-16T00:21:33+5:30

नाशिक : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून, यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.

 Youth skill honor ceremony | युवा कौशल्य सन्मान सोहळा

युवा कौशल्य सन्मान सोहळा

ठळक मुद्देशहरातून रॅली : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त रोजगार मार्गदर्शन

नाशिक : कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून, यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नाशिकमधील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्थातर्फे जिल्हा नियोजन भवन येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळ्यात त्या बोलत होते.
यावेळी आमदार फरांदे यांनी भारत हा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ असणारा देश असेल, असा विश्वास व्यक्त केला.
तर सीमा हिरे यांनी देशातील लोकसंख्येच्या ६० टक्के असलेल्या तरु णांमध्ये भारत घडविण्याचे सामर्थ्य असल्याचे सांगितले.
व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राचे उपमहाव्यवस्थापक जितेंद्र कामठीकर, कौशल्य विकास अधिकारी अशोक चव्हाण, बाळासाहेब जाधव, सागर भाबड आदी उपस्थित होते.
दरम्यान, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या संस्था आणि रोजगार प्रोत्साहन योजनेत रोजगारक्षम प्रशिक्षणाचा जास्त लाभ देणाºया उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले.
खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ‘यंग इंडिया, स्कील इंडिया’, कौशल्यनिपुण महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट आदी घोषणा देत जनजागृती रॅलीत सहभाग घेतला.

Web Title:  Youth skill honor ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी