शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:34 IST

दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़  सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बागले दुचाकीवरून घरी परतत असताना सिएट कंपनीजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने मित्र संशयित सुनील पंडित खरात (२१), लोकेश अशोक थोरात (१८), किरण मधुकर बिन्नर (१९, तिघेही रा़ साईबाबानगर चौक, सातपूर) यांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले़ त्यानुसार तिघेही पेट्रोल घेऊन गेले मात्र त्यांना येण्यास उशीर का झाला या कारणावरून अमोल बागले याने शिवीगाळ केली व एकाच्या कानशिलातही लगावली़या प्रकारामुळे तिघाही संशयित मित्रांनी अमोल बागले यास जबर मारहाण केली. तर एकाने धारदार हत्यार काढून पोटात भोसकले. यानंतर या तिघांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रथम जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास अमोल बागले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता़

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस