दहेगाव येथील युवकाचा खून अनैतिक संबंधातून

By Admin | Updated: July 23, 2014 00:24 IST2014-07-22T22:59:31+5:302014-07-23T00:24:05+5:30

तपासात निष्पन्न : तिघांना पोलीस कोठडी

Youth murder in Dahegaon | दहेगाव येथील युवकाचा खून अनैतिक संबंधातून

दहेगाव येथील युवकाचा खून अनैतिक संबंधातून

वणी : दहेगाव येथील युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, तीन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने २५ जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहिदास काळू पिळे (वय २१, रा. दहेगाव, ता. दिंडोरी) याचा मृतदेह दहेगाव शिवारातील सुरेश निकम यांच्या शेतजमिनीच्या विहिरीत आढळून आला होता. शवविच्छेदनाअंती गळा दाबून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस निरीक्षक शंकरराव बाबर यांनी या घटनेचा बारकाईने तपास करीत चौकशी सुरू केली. चौकशीअंती कळाले की, अनैतिक संबंधातून हिरामण दत्तू धुळे (२७), छबू दत्तू धुळे (३०), आनंदा विनायक धुळे (वय २६, रा. दहेगाव) या तिघांनी कट रचून प्रथमत: रोहिदासला बोलावले व तद्नंतर त्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहिदास जिवंत राहिल्याने धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर वार करून त्याचा खून केल्याचा कबुलीजबाब पोलिसांना दिल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Youth murder in Dahegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.