शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे युवक-युवती परिचय संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:12 IST

आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकरोड : आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या लोकांनी कोणताही बडेजाव न करता साध्या पद्धतीने विवाह केल्यास सर्वसामान्य लोक त्यांचे अनुकरण करतील, त्यातून समाजात विवाहाबाबत आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी पोलीस उपायुक्त धनराज दायमा यांनी केले. नाशिक जिल्हा माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दायमा बोलत होते.आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सकल वैवाहिक रिश्ते ही हमारा लक्ष्य हैं’ या विषयावर मार्गदर्शन करताना दायमा म्हणाले की, जीवनचक्रात प्रत्येक जण सुखी, आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये विवाह हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, वैवाहिक जीवन सुखी असेल तरच प्रत्येक जण सुखी आनंदी राहू शकतो.विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भगवान श्री महेश यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे उपाध्यक्ष अशोक बंग, प्रदेश उपाध्यक्ष रामविलास बूब, उद्योजक वसंत राठी, जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा, अमर कलंत्री, रामविलास लोहिया, प्रकाश लढ्ढा, किशोर राठी, मधुसूदन काबरा, रामविलास राठी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विवाहयोग्य युवक-युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहेश्वरी सभा नाशिकरोड अध्यक्ष श्रीनिवास लोया यांनी स्वागत केले.दिल मिलाई जमविणे गरजेचेलग्न ठरविताना कुंडली जमविण्यापेक्षा दिल मिलाई जमविणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे लग्न ठरविताना कुठल्याही प्रकारची माहिती न लपविता दोन्ही कुटुंबाने व मुला-मुलीने एकमेकांना पारदर्शकपणे सर्व काही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही, असेही दायमा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न