वाहनाच्या धडकेत युवक ठार

By Admin | Updated: June 1, 2017 00:51 IST2017-06-01T00:51:23+5:302017-06-01T00:51:36+5:30

सिन्नर : अज्ञात वाहनाने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील विनायक नवनाथ वरंदळ (२७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Youth killed in vehicle crash | वाहनाच्या धडकेत युवक ठार

वाहनाच्या धडकेत युवक ठार

 लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : अज्ञात वाहनाने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील विनायक नवनाथ वरंदळ (२७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
विनायक वरंदळ हा युवक बुलेट मोटारसायकल (क्र. एम. एच. १५ ई. झेड. ९२४८) ने रात्री सिन्नरकडून लोणारवाडीकडे जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विनायक याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Youth killed in vehicle crash