दुचाकी अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:08 IST2017-10-29T00:07:52+5:302017-10-29T00:08:00+5:30
तपोवनातून घरी परतत असताना दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात कलाधिपती ढोल पथकातील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास घडली़ ऋषिकेश मोहन पुजारी (२३, रा़ काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे़

दुचाकी अपघातात युवक ठार
नाशिक : तपोवनातून घरी परतत असताना दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात कलाधिपती ढोल पथकातील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास घडली़ ऋषिकेश मोहन पुजारी (२३, रा़ काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास ऋषिकेश पुजारी व त्याचा मित्र निखिल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे दुचाकीने तपोवनातून घरी परतत होते़ तपोवन मार्गावरील एका झाडावर त्यांची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पुजारीच्या डोके व हातापायास जबर मार लागला़ पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास जखमी ऋषिकेशला त्याचा भाऊ उमेश याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारादरम्यान ऋषिकेशचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़