दुचाकी अपघातात द्वारका परिसरातील युवक ठार
By Admin | Updated: March 15, 2017 23:19 IST2017-03-15T23:16:56+5:302017-03-15T23:19:07+5:30
नाशिक : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात टाकळीरोड परिसरातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास सिडकोतील लेखानगर परिसरात घडली़

दुचाकी अपघातात द्वारका परिसरातील युवक ठार
नाशिक : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात टाकळीरोड परिसरातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १३) दुपारच्या सुमारास सिडकोतील लेखानगर परिसरात घडली़ अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव विक्रांत सांगोडे (२६, रा. काशीविजय बंगला, अनुसयानगर, टाकळीरोड, द्वारका) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत सांगोडे हा दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, डीवाय २२२६) पाथर्डी फाट्याकडून नाशिककडे महामार्गावरील सर्व्हिस रोडने जात होता़ लेखानगरजवळील शिवाजी पुतळ्याजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो दुभाजकावर जाऊन आदळला़ यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला़
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)