वणीजवळ अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 15:47 IST2017-11-24T12:46:55+5:302017-11-24T15:47:14+5:30
वणी- वणी- दिंडोरी रस्यावर दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर दुसरा जखमी झाला आहे.

वणीजवळ अपघातात युवक ठार
वणी- वणी- दिंडोरी रस्यावर दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर दुसरा जखमी झाला आहे.राहुल गोविंद नाठे (३१) व सुनिल बारकु नाठे (३२) हे दोघे गुरुवारी रात्री दुचाकीवरून जात असताना वनविभागाच्या रोपवाटिकेलगतच्या परिसरात अज्ञात वाहन व दुचाकीमध्ये अपघात झाला. अपघाताची माहिती पोलिसांना व कुटुंबियांना उशिरा समजली. रात्री बारा वाजेच्या दरम्यान राहुल गोविंद नाठे हे गंभीर जखमी अवस्थतेत आढळले तर सुनिल नाठे यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले होते. दरम्यान राहुल नाठे यांना ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता त्याना मृत घोषित करण्यात आले. अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त दुचाकी घटनास्थळावर आढळुन आली नसल्याने दुचाकी व अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील पाडे येथील हे युवक असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.