शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या अपघातात युवक ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 14:29 IST

बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे १ लाख ९ हजार ३०० रुपयांचे दागिने व रक्कम लंपास केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देकाठेगल्लीत एक लाखाची घरफोडीमोबाईल हातातून हिसकावला

नाशिक : पारिजातनगर सिग्नलवरून वनविहार कॉलनीमार्गे भरधाव जात असलेल्या एका केटीएम बाइकस्वाराने (एमएच १५, डीएन ७३७०) अ‍ॅक्टीवा मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अ‍ॅक्टीवा (एमएच १५, जीजी १८७३) चालविणारा युवक विशाल नागेश लहांगे हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केटीएम बाइकस्वार हा प्रचंड वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत जात असताना हा अपघात घडला. अ‍ॅक्टीवावरील दुसरा युवक जीवन दत्तू कासोदे (२२) हादेखील गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात केटीएम बाइक भरधाव चालविणारा साहील अनिल पसरिचा यालाही जबर मार लागला, मात्र त्याने अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे त्र्यंबक बबन झोले (३५, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पसरिचा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक डी. एल. माळी हे करीत आहेत.

काठेगल्लीत एक लाखाची घरफोडीकाठेगल्ली परिसरातील आदित्य भवनात राहणारे चंद्रकांत केशव हुंडीकर (६६) हे त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी तिडके कॉलनीत आले होते. याचाच फायदा घेत त्यांचे बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे १ लाख ९ हजार ३०० रुपयांचे दागिने व रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी हुंडीकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.मोबाईल हातातून हिसकावलानाशिक शहर व परिसरात पादचाऱ्यांच्या हातातून मोबाईल हिसकावण्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. तीन दिवसांपुर्वीच इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने दोघा मोबाईल स्नॅचरांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख रूपये किंमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत केले; मात्र पुन्हा पाथर्डी शिवारातील एका शिवमंदिरासमोरून मयुर अंबुश्ािंग पाटील (१९,रा.नरहरीनगर) हा युवक मोबाईलवर बोलत पायी जात असताना पांढºया रंगाच्या अ‍ॅक्टीवा दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांपैकी चालकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. विवो कंपनीचा सुमारे १६ हजार रूपये किंमतीचा स्मार्टफोन चोरी झाल्याची फिर्याद पाटील याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे

टॅग्स :Accidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDeathमृत्यू