चारचाकी कठड्यावर आदळून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:33 IST2017-11-05T00:33:52+5:302017-11-05T00:33:57+5:30
: येथील जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंग केल्यानंतर चारचाकीतून घरी परतत असताना चारचाकी राणेनगर बोगद्याच्या अलीकडील कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़४) सकाळी घडली़ विकास रामराव पाटील (३०, रा़ पाथर्डी फाटा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़

चारचाकी कठड्यावर आदळून युवक ठार
इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंग केल्यानंतर चारचाकीतून घरी परतत असताना चारचाकी राणेनगर बोगद्याच्या अलीकडील कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़४) सकाळी घडली़ विकास रामराव पाटील (३०, रा़ पाथर्डी फाटा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास पाटील हे नेहेमीप्रमाणे शनिवारी सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंगसाठी आले होते़ जॉगिंगनंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील समांतर रस्त्यावरून पाटील आपल्या चारचाकीने (एम़एच ०४, एफए २६३४) पाथर्डी फाट्याकडील घरी परतत होते़ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राणेनगर बोगद्याच्या अलीकडे असलेल्या कठड्यावर त्यांची चारचाकी आदळून झालेल्या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़