बसच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 00:45 IST2016-07-14T00:44:11+5:302016-07-14T00:45:35+5:30
बसच्या धडकेत युवक ठार

बसच्या धडकेत युवक ठार
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी जवळील दारणा नदी पुलाजवळ बसने दिलेल्या धडकेत पळसे गावातील युवक जागीच ठार झाला आहे. पळसे आगळे मळा येथे राहणारा युवक विश्राम रामायण सहाणे (३५) हा नाशिकरोडहून दुचाकीवर पळसेच्या दिशेने येत होता. यावेळी राजस्थान परिवहन महामंडळाची शिर्डी-उदयपूर बस सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने सहाणे जागीच ठार झाला.