युवा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:52 IST2019-01-10T17:52:32+5:302019-01-10T17:52:48+5:30

चांदवड - वडनेर भैरव येथील मविप्र संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने युवक महोत्सवाला प्रारंभ झाल्याची माहिती प्राचार्य ए एल भगत यांनी दिली.

Youth Festival Start | युवा महोत्सवास प्रारंभ

युवा महोत्सवास प्रारंभ

चांदवड - वडनेर भैरव येथील मविप्र संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने युवक महोत्सवाला प्रारंभ झाल्याची माहिती प्राचार्य ए एल भगत यांनी दिली. पहिल्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील पीएचडी संशोधक विद्यार्थी राहुल मुळे यांच्या व्याख्यानाने सदर महोत्सवाची औपचारिक सुरु वात करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य भगत यांनी युवकांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील दहा दिवस महाविद्यालयात विविध प्रकारचे डेज,क्र ीडा प्रकार, आनंद मेळावा, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्र म अशा भरगच्च कार्यक्र मांचं आयोजन करण्यात येणार असून 14 जानेवारीला गावफेरी 15 जानेवारी कवी संमेलन 17 जानेवारी विविध सांस्कृतिक कार्यक्र म असा कार्यक्र मांचा आयोजन या दरम्यान केले जाणार आहे तसेच 16 जानेवारी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्याच्या हेतूने माजी विद्यार्थी मेळावा व पालक मेळावा यांचेही आयोजन करण्यात येणार असून त्यांच्याशी संस्थेच्या सरचिटणीस नीलमताई पवार या संवाद साधणार आहे

Web Title: Youth Festival Start