गिरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: August 14, 2016 23:55 IST2016-08-14T23:53:28+5:302016-08-14T23:55:04+5:30
गिरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
मालेगाव : गिरणा नदीपात्रालगत बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मोहंमद रिजवान मोहंमद अक्रम (२०), रा. मिल्लतनगर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. छावणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. रिजवान हा आपल्या मित्रांसमवेत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना ३० फूट खोलवर पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आमदार आसीफ शेख यांनी अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाचा जलतरणपटू शकील अहमद मोहंमद शाकीर व वासीफ शेख, विशाल शेजवळ, निजामुद्दीन शेख यांनी रिजवानचा मृतदेह शोधून काढला.