शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला रुग्णालयाच्या पायरीवरच युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:49 IST

चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या पायरीवरच  मृत्यू झाला.  

चांदवड : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या पायरीवरच  मृत्यू झाला.  वडनेर भैरवजवळील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी (३५) हा मंगळवार, २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी सुरेखा हिच्याबरोबर चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील  कोविड सेंटर येथे तब्बेत बरी नसल्याने तपासणीसाठी आला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. माळी यांची ऑक्सिजन लेव्हल अगदी ३० ते ३५ पर्यंतच होती. त्यामुळे हा रुग्ण कोविड सेंटरच्या पायरीजवळ कोसळला.  त्याला तातडीने रुग्णालयात स्ट्रेचरवर  नेवून  डॉ. सोनवणे यांनी तपासणी केली. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगी आरती, मुलगा आदित्य आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू