येवल्यात आज शिक्षण संघर्ष यात्रा
By Admin | Updated: November 14, 2014 00:27 IST2014-11-14T00:13:16+5:302014-11-14T00:27:21+5:30
येवल्यात आज शिक्षण संघर्ष यात्रा

येवल्यात आज शिक्षण संघर्ष यात्रा
येवला : शिक्षणात उभ्या राहत असलेल्या भिंती पाडण्यासाठी आता संघटीत होऊन संघर्ष करण्याच्या उद्देशाने राज्यातील अनेक शिक्षण संस्था, संघटनांनी एकत्र येऊन काढलेली शिक्षण संघर्ष यात्रा
शुक्र वारी (दि.१४) येवल्यात येत आहे.
येवला शहर व तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष यात्रेचे संयोजक व समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी केले. यावेळी शिक्षण संस्थाकडून शुल्क वाढीच्या माध्यमातून होणारी पालकांची आर्थिक लूट, शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, पालकांना होणारा मनस्ताप या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. ही संघर्ष यात्रा सकाळी येणार असून, यात्रेचे स्वागत एरंडगाव येथे होणार आहे.(वार्ताहर)