युवक कॉँग्रेसने सभापतींना दिली पुष्पगुच्छांची भेट

By Admin | Updated: August 6, 2014 00:38 IST2014-08-05T23:43:54+5:302014-08-06T00:38:10+5:30

युवक कॉँग्रेसने सभापतींना दिली पुष्पगुच्छांची भेट

Youth Congress gifted bouquets to the Speaker | युवक कॉँग्रेसने सभापतींना दिली पुष्पगुच्छांची भेट

युवक कॉँग्रेसने सभापतींना दिली पुष्पगुच्छांची भेट

 

नाशिक : मागील आठवड्यातच शहर युवक कॉँग्रेसने शहरातील खड्ड्यांबाबत गांधीगिरी करत पंचवटीतील निमाणी बसस्थानकातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले होेते. महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी (दि. ५) पंचवटीतील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी शहर युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार जगताप यांनी राहुल ढिकले यांना पुष्पगुच्छ देत, नुसती पाहणी नको, खड्डे बुजवा, अशी मागणी केली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल अडीच वर्षांनंतर शहरातील रस्त्यांवर उतरत खड्ड्यांची पाहणी केली. पंचवटी येथील दिंडोरीरोडवर खड्डे पाहणी करत असतानाच युवक कॉँग्रेसने अ‍ॅड. राहुल ढिकले यांना पुष्पगुच्छ देत खड्डे पाहणीसाठी दौरा काढल्याबद्दल आभार मानले. मात्र, नुसतीच पाहणी न करता खड्डे बुजवण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी तुषार जगताप यांच्यासह वीरेंद्र भुसारे, दीपक जाधव, राजाभाऊ जाधव, कृष्णा पानसरे, विशाल शेवाळे, बंटी जामदार, गणेश राजपूत, आकाश जगताप, बापू सपकाळ आदिंनी केली. याप्रसंगी मनसे नगरसेवक गणेश चव्हाण, पंचवटी विभागीय अधिकारी वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Youth Congress gifted bouquets to the Speaker