वणी : दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील ३३ वर्षीय युवकाने घरगुती वादातून गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली.रमेश गोपीनाथ भुसार, रा. कोल्हेर याने घरगुती वादातून घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रमेशला वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी तपासून मृत घोषीत केले. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गुजरात राज्यातील मजुराचा हृदयविकाराने मृत्यूवणी : गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील मजुराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वणी येथे घडली. जीवराम काशीनाथ पवार (४०, रा. चिखलदरा, तनखळ अहवा, जिल्हा डांग) वणी परिसरात मजुरीचे काम करत होते. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दिंडोरी तालुक्यातील युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:34 IST
वणी : दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील ३३ वर्षीय युवकाने घरगुती वादातून गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली.
दिंडोरी तालुक्यातील युवकाची आत्महत्या
ठळक मुद्देगुजरात राज्यातील मजुराचा हृदयविकाराने मृत्यू