तरुणावर तलवारीने हल्ला
By Admin | Updated: July 26, 2016 00:35 IST2016-07-26T00:32:21+5:302016-07-26T00:35:47+5:30
तरुणावर तलवारीने हल्ला

तरुणावर तलवारीने हल्ला
सिडको : कबुतरे खरेदीविक्रीच्या किरकोळ वादातून, तसेच मागील भांडणाची कुरापत काढून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवारीने हल्ला चढविला. या हल्ल्यात पवन विनायक वायाळ (१९, सावतानगर) हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास आठ संशयितांच्या टोळक्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबड पोलिसांनी या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित प्रदीप गोफणे, नवख्या कण्या ऊर्फ फरहान शेख, देव्या, हरिष बोरसे ऊर्फ हप्या-पह्या व त्यांच्या अन्य साथीदारांविरुध्द शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)