कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी युवकांची अजूनही धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST2021-06-06T04:11:45+5:302021-06-06T04:11:45+5:30
सिडकोतील शौर्य फाउंडेशन, सिंह गर्जना युवा मंच व कोकण भवन मित्रमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेतला असून, जात, ...

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी युवकांची अजूनही धावाधाव
सिडकोतील शौर्य फाउंडेशन, सिंह गर्जना युवा मंच व कोकण भवन मित्रमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेतला असून, जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून कोरोनामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी शेकडो हात दररोज झटत आहेत. त्यासाठी बाधित रुग्णांना रुग्णालय, औषधे, वैद्यकीय सेवा मिळवून देण्यापासून ते घरात कोरोनाचा रुग्ण असेल तर अशा कुटुंबीयांना बाहेरून पाहिजे ती मदत केली जात आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन एक महिन्याच्या किराणा मालाचा शिधा देण्याबरोबरच रुग्णालयात दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना दोन्ही वेळचे भोजन न चुकता वेळेवर पोहोचते केले जात आहे. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीत काम करणारे कामगार, रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनादेखील नास्ता, जेवण, पिण्याचे पाणी पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. अजिंक्य शिर्के, प्रीतम भामरे, तुषार जगताप या ध्येयवेड्या युवकांनी याकामी पुढाकार घेतला असून, आजवर शेकडो कुटुंबीयांच्या उदरभरणाची व्यवस्था या तरुणांनी केली आहे.
येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडे, शहरातील गरजूंना सुमारे एक हजार फूड किट्चे वाटप करण्याचा संकल्पही या युवकांनी सोडला आहे.