शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

युवती ठार : गतिरोधकावर वेग कमी केला अन‌् काळाने झडप घातली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 20:01 IST

दिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपुणे महामार्गावरील नेहरूनगरजवळ घडली दुर्घटनावडिलांपाठोपाठ मुलीचाही अपघाती मृत्यू

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर शाळेसमोरील गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी करताच पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार युवतीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवती रस्त्यावर कोसळून ट्रकच्या चाकांखाली सापडून जागीच ठार झाली. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का रवींद्र दिवटे (१९) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.नाशिकरोड गुरुद्वारामागील विद्याविहारनगर येथील पद्मावती सोसायटीत राहणारी अनुष्का ही रविवारी दुपारी द्वारका येथे आपल्या आजोबांच्या घरी गेली होती. तेथून ४ वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने अक्टिवा मोपेड दुचाकीने (एम.एच १५ डी-झेड ७९५६) घरी निघाली होती. यावेळी नेहरूनगर सेंट झेव्हियर शाळेसमोर महामार्गावर टाकलेल्या गतिरोधक ओलांडताना अनुष्काने दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रक (क्र. एमएच २४ एफ ९७८६) चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे ती खाली कोसळली आणि ट्रकच्या चाकांखाली सापडून गतप्राण झाली. ट्रकचे चाक हेल्मेटवरून गेल्याने हेल्मेटचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थाबंता नाशिकरोडच्या दिशेने ट्रकसोबत पळ काढला. मात्र पादचारी नागरिकांनी तत्काळ पोलिसांना अपघाताची खबर दिल्याने नाशिकरोड पोलिसांनी त्वरित ट्रकचालक उमेश सुभाष वकोरे (३८,रा. ढोकी, उस्मानाबाद) याला पोलीस ठाण्याजवळ ट्रकसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अनुष्का हिच्या पश्चात आई, लहान भाऊ आहे. दिवटे कुटुंबाची ती एकुलती एक मोठी मुलगी काळाने हिरावल्याने त्यांच्यावर आभाळ फाटले.वडिलांपाठोपाठ मुलीचाही अपघाती मृत्यूदिवटे कुटुंबीयांची अनुष्का ही मोठी मुलगी होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. वडिलांचा पाठोपाठ मुलीवरही काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिवटे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पद्मावती सोसायटी परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली होती.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग