पैसे भरण्याचा बहाणा करून युवकाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 23:13 IST2016-02-04T23:12:00+5:302016-02-04T23:13:29+5:30
पैसे भरण्याचा बहाणा करून युवकाला गंडविले

पैसे भरण्याचा बहाणा करून युवकाला गंडविले
पंचवटी : इंद्रकुंडावरील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैसे भरण्यासाठी आलेल्या युवकाच्या हातात कागदी बंडल देऊन पंधरा हजार रुपयांची रोकड हडप केल्याची घटना दुपारी घडली आहे. याबाबत पोलिसांत दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी पाऊण वाजता सोमनाथ भांगरे हे बॅँक आॅफ इंडियाच्या इंद्रकुंडावरील शाखेत पंधरा हजार पाचशे रुपयांचा भरणा करण्यासाठी आले असता त्यावेळी तेथे दोन संशयित आले व त्यांनी भांगरे यांना आम्हाला एक लाख रुपये भरायचे आहे, असे म्हणून रुमालात गुंडाळलेले कागदी बंडल पैसे म्हणून भांगरे यांच्या हातात दिले व त्यांच्याकडील पंधरा हजार पाचशे रुपयांची रोकड घेतली व आम्हाला काम आहे, परत येतो असे म्हणून ते निघून गेले. संशयित परत न आल्याने भांगरे यांनी रुमाल उघडला असता त्यात कागदाचे बंडल असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)