शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डम्परच्या धडकेत तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:21 IST

संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. 

नाशिक : संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. वडाळागाव मार्गे नाशिक रोडकडे जात असताना रविशंकर मार्गावरून कॅनॉल रोड चौफुली ओलांडताना राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने (एमएच ४६ बीएफ ९६४६) पवारच्या दुचाकीला (एमएच ०५ सीएस ५१७२) जोरदार धडक दिली. यावेळी पवार डम्परच्या मागील चाकाखाली सापडल्याने जागीच चिरडला गेला. यामुळे त्याच्या डोक्यावरून पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डम्पर चालकाने त्याचे वाहन घटनास्थळी सोडून पलायन केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळी बघ्यांची जमलेली गर्दी पोलिसांनी पांगविली. तत्काळ पवारचा मृतदेह पोलिसांनी झाकून शववाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू