शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर हल्ला करणारा तरुण अद्याप मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:32 IST

लासलगाव येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरात घुसून चाकूने तब्बल अठरा प्राणघातक वार करणाºया युवकाला गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनदेखील लासलगावचे पोलीस अधिकारी अटक करीत नसल्याने पोलिसांच्या ढिम्मपणाची लेखी तक्र ार पीडित विद्यार्थिनीच्या आईने थेट नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे केली आहे

ठळक मुद्देलासलगाव पोलिसांचे दुर्लक्ष : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

लासलगाव : येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरात घुसून चाकूने तब्बल अठरा प्राणघातक वार करणाºया युवकाला गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनदेखील लासलगावचे पोलीस अधिकारी अटक करीत नसल्याने पोलिसांच्या ढिम्मपणाची लेखीतक्र ार पीडित विद्यार्थिनीच्या आईने थेट नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव पोलीस कार्यालयाची सूत्रे स्वीकारणारे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना विचारले असता प्राणघातक हल्ला करणाºया युवकाच्या मागावर गृहरक्षक दलाचे जवान लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.लासलगाव शहरात एकतर्फी प्रेमातून घरात घुसून अल्पवयीन युवतीवर टाकळी विंचूर येथील अतिश ढगे या युवकाने धारदार चाकूने वार करून स्वत:वरही वार करून घेतले होते. या खुनी हल्ल्यात अल्पवयीन युवती गंभीर जखमी झाली होती व हा युवक किरकोळ जखमी झाला होता. या दोघांनाही नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर अल्पवयीन युवतीची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने लासलगाव शहरातील युवावर्गाने एकत्र येत व लोकसहभागातून वर्गणी काढत तिच्यावर तब्बल पंधरा ते वीस दिवस उपचार करून तिला वाचविण्यात यश मिळाले होते.किरकोळ जखमी असलेला आतिश ढगे यास नाशिक येथे खासगी उपचारानंतर सोडून देण्यात आले; मात्र त्यानंतरही लासलगाव पोलिसांनी सदर संशयितास अद्याप ताब्यात घेतलेले नाही. लासलगाव पोलिसांना या गोष्टीचे गांभीर्य राहिले नसल्याचा आरोप करीत पीडित युवतीच्या आईने पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे आपले गाºहाणे लेखी स्वरूपात मांडले आहे. लासलगाव पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे.पोलीस होमगार्डच्या भरोशावरदीड महिन्यापूर्वी ही घटना लासलगाव शहरात घडली, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सदर संशयिताला सोडून दिलेले आहे. त्यानंतरही लासलगाव पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलेले नाही. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सदर संशयितांवर होमगार्ड देखरेख ठेवत असल्याचे अनोखे उत्तर दिले. पोलीस संख्या योग्य प्रमाणात असतानाही होमगार्डच्या भरोशावर लासलगाव पोलीस आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी