दुचाकी अपघातात ढकांबेचा युवक ठार

By Admin | Updated: December 22, 2015 23:24 IST2015-12-22T23:18:27+5:302015-12-22T23:24:39+5:30

दुचाकी अपघातात ढकांबेचा युवक ठार

A young man stabbed in a two-wheeler crash | दुचाकी अपघातात ढकांबेचा युवक ठार

दुचाकी अपघातात ढकांबेचा युवक ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे सोमवारी (दि़२१) सायंकाळच्या सुमारास घडली. मयत युवकाचे नाव कौरदास पहारदास (३०, रा. ढकांबे) असे आहे. दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कौरदास हा आपल्या दुचाकीवरून जात असताना ढकांबे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यास जबर धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालात दाखल केले असता, मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man stabbed in a two-wheeler crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.