आंबेडकर गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST2021-05-16T04:14:09+5:302021-05-16T04:14:09+5:30
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांना अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करीत एकाच्या हातावर ...

आंबेडकर गार्डनमध्ये तरुणावर सुरीने वार
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांना अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करीत एकाच्या हातावर सुरीने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव नरेंद्र काथवटे (१७, रा. सावरकर चौक, भोई गल्ली) व त्याचा मामेभाऊ असे दोघे जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेले असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी काथवटे याच्या मामेभावाला मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी काथवडे याने मध्यस्थी करून त्याच्या मामेभावाला सोडविण्यास गेला असता हल्लेखोरांनी त्याच्याही दोन्ही हातांवर सुरीने वार करून दुखापत केली. या प्रकरणी गौरव काथवटे याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.