Young man killed in car crash | कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरटाकळी, समतानगर येथे राहणारा रोहित प्रमोद निकाळे याने या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित निकाळे व राहल जाधव दोघे मित्र गुरुवारी मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२७३)वरून राहुलच्या कामानिमित्त नांदुर नाका येथे गेले होते. संबंधित काम आटोपून सैलानीबाबा दर्गा येथून इंदिरा गांधी पुतळा, नारायणबापू चौकाच्या दिशेने जात असताना, पिन्टो कॉलनीजवळ भरधाव वेगात आलेल्या चारचाकी कारने (एमएच १२ एचझेड ५८७६) मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने, दुचाकीवरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. या अपघातात राहुल गंभीर जखमी झाल्याने, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर रोहित निकाळेही जखमी झाला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man killed in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.