काळखोडे येथील तरुणास मारहाण
By Admin | Updated: December 4, 2015 21:58 IST2015-12-04T21:58:13+5:302015-12-04T21:58:41+5:30
काळखोडे येथील तरुणास मारहाण

काळखोडे येथील तरुणास मारहाण
तळेगाव रोही : काळखोडे येथील एका तरुणास विंचूर येथील वनपरिक्षेत्रात नेऊन काही अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केली.
सुरेश शेळके हे लासलगाव बाजार समितीच्या आवारात हरभरा बियाणे खरेदीसाठी गेले असता, ओम्नी गाडीतून आलेल्या चार अनोळखी तरुणांनी त्यांना गाडीत कोंबले व विंचूरजवळ सुनाट जागेचा फायदा घेऊन खिशातील पाच
हजार रुपये व भ्रमणध्वनी हिसकावून बेदम मारहाण केली. शळके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे समजते. (वार्ताहर)
नाशिक : तेली समाजाच्या वतीने मुंबईनाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात २५ डिसेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.