काष्टी फाट्यावर अपघातात तरुण ठार
By Admin | Updated: August 21, 2016 01:19 IST2016-08-21T01:18:12+5:302016-08-21T01:19:10+5:30
काष्टी फाट्यावर अपघातात तरुण ठार

काष्टी फाट्यावर अपघातात तरुण ठार
मालेगाव : नामपूर-मालेगाव रस्त्यावरील काष्टी फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक मारुन दुचाकीचालक ज्ञानेश्वर शेखर माळी, रा. रानबाईवस्ती, काष्टी फाटा याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोरख जगन अहिरे यांनी फिर्याद दिली. दुचाकी (क्र.४७२७) वरील चालक (नाव माहीत नाही) याने अजंगकडून मालेगावकडे भरधाव वेगात वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी (क्र. एमएच ४१ एएच ३९०५) ला धडक देऊन गोरख अहिरे यांच्या गंभीर दुखापतीस व ज्ञानेश्वर माळी याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.