आदर्श शिक्षक निवडीवरून तू तू मैं मैं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST2017-09-02T00:53:13+5:302017-09-02T00:53:41+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाºया आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत निवडीवरून वाद झाल्याने हा पुरस्कार वादात सापडल्याची चर्चा आहे.

You are the best choice I am | आदर्श शिक्षक निवडीवरून तू तू मैं मैं

आदर्श शिक्षक निवडीवरून तू तू मैं मैं

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाºया आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत निवडीवरून वाद झाल्याने हा पुरस्कार वादात सापडल्याची चर्चा आहे. कळवण तालुक्यातून प्राप्त प्रस्तावांवर एकमत होत नसल्याने पदाधिकाºयांमध्ये वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कळवण तालुका वगळता १४ तालुक्यातील शिक्षक पुरस्कार अंतिम करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.
आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार निवडीबाबत अध्यक्ष दालनात शुक्रवारी (दि.१) अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस शिक्षण सभापती यतिन पगार, समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर आदी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी तीन प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित असताना यंदा १५ तालुक्यांतून केवळ २७ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी-नियमानुसार प्रस्तावांवर चर्चा होऊन गुण देण्यात आले. मात्र, कळवण तालुक्यातून प्राप्त झालेल्या तीन प्रस्तावांवर पदाधिकाºयांमध्ये एकमत झाले नाही, प्राप्त प्रस्तावांवर एका पदाधिकाºयाने आक्षेप घेतल्याचे कळते. त्यामुळे पदाधिकाºयांमध्येच तू तू मैं मंै झाली असल्याची चर्चा आहे.

Web Title: You are the best choice I am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.