यॉर्क महिला कार रॅलीस प्रारंभ आज रंगणार थरार

By Admin | Updated: December 7, 2014 01:22 IST2014-12-07T01:21:45+5:302014-12-07T01:22:17+5:30

यॉर्क महिला कार रॅलीस प्रारंभ आज रंगणार थरार

York women's car rally starts thrashing today | यॉर्क महिला कार रॅलीस प्रारंभ आज रंगणार थरार

यॉर्क महिला कार रॅलीस प्रारंभ आज रंगणार थरार

  नाशिक : खास महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वांगी प्रस्तुत यॉर्कवुमन्स रॅलीस आज वाजत गाजत बहारदार प्रारंभ झाला़ स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सहभागी महिला स्पर्धकांच्या गाड्यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली़, तर रविवारी (दि़ ७) सकाळी ८ वाजल्यापासून या स्पर्धेचा थरार नाशिक शहराजवळील भागात रंगणार आहे़ कॉलेजरोड येथे आज सायंकाळी नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ आपण स्वत: मागील वर्षीच्या महिला कार रॅलीत सहभागी झाल्याचे सीमा हिरे यांनी यावेळी सांगत महिलांचे मनोबल वाढवले़ तसेच स्पर्धक महिलांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी रेड एफएमचे संजीव जिंदाल आणि सर्वांगी सारीजचे कृष्णा भांडगे उपस्थित होते. स्पर्धेच्या पूर्वसंध्येला कॉलेजरोडवरील सर्वांगी सारीजच्या शोरूमपासून सहभागी कारची शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये गंगापूररोड आणि कॉलेजरोड या मार्गे गाड्या फिरून परत सर्वांगी सारीज येथे येऊन या ठिकाणी गाड्यांची अंतिम तपासणी झाली. सहभागी स्पर्धकांमध्ये मागील वर्षीच्या महिला स्पर्धेच्या विजेत्या सविता पाटील आणि अंजनी गंगावणे यांचा या रॅलीत समावेश होता . रविवारी (दि़७) सकाळी ८ वाजता कॉलेजरोड येथील सर्वांगी सारीज येथून रॅलीला सुरुवात होणार आहे़ नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात फिरून यॉर्क वायनरी येथे स्पर्धेची सांगता होणार आहे़ सायंकाळी स्पर्धेचे निकाल जाहीर केले जाऊन बक्षीस समारंभ यॉर्क वायनरी येथे होणार आहे़

Web Title: York women's car rally starts thrashing today