आघारच्या उपसरपंचपदी योगेश खरे यांची निवड
By Admin | Updated: August 27, 2016 22:06 IST2016-08-27T22:05:27+5:302016-08-27T22:06:15+5:30
आघारच्या उपसरपंचपदी योगेश खरे यांची निवड

आघारच्या उपसरपंचपदी योगेश खरे यांची निवड
आघार बु।। : येथील उपसरपंचपदी योगेश कौतिक खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
२२ एप्रिल २०१५ मध्ये ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे आघार बु।। च्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवड ११ सदस्यांची झाली. त्यात पॅनलचे नेतृत्व करणारे मालेगाव शेतकी संघाचे सभापती समाधान हिरे यांचे ७ उमेदवार निवडून आले होते. सरपंचपदी सौ. यमुनाबाई दिलीप निकम यांची तर उपसरपंचपदी कैलास नामदेव सावंत यांची निवड झाली होती; परंतु रोटेशन पद्धतीप्रमाणे एक वर्षाचा उपसरपंच पदाचा कार्यभार संपल्याने उपसरपंच कैलास नामदेव सावंत यांनी राजीनामा दिला. सदर राजीनामा मंजूर होवून सरपंच सौ. यमुनाबाई दिलीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे यांनी उपसरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे उपसरपंचपदी योगेश कौतिक खरे यांची बिनविरोध निवड केली. यावेळी उपस्थित सरपंच सौ. यमुनाबाई निकम, कैलास सावंत, विठ्ठल पवार, द्वारकाबाई पवार, युवराज अहिरराव, इंदूबाई जाधव, अनिता माळी, उज्वला भामरे होते.(वार्ताहर)