सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी योगेश घोटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:57+5:302021-07-17T04:12:57+5:30

सिन्नर : तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर यांची, उपाध्यक्षपदी सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, तर सचिवपदी ...

Yogesh Ghotekar as the taluka president of Sarpanch Parishad | सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी योगेश घोटेकर

सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी योगेश घोटेकर

सिन्नर : तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर यांची, उपाध्यक्षपदी सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, तर सचिवपदी घोटेवाडीच्या सरपंच मंजुश्री घोटेकर व खजिनदारपदी देवपूरच्या सरपंच अनुराधा गडाख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सरपंचांना ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याबरोबरच शासनाच्या योजना ग्रामपातळीवर राबविण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासन पातळीवर विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिन्नर तालुका सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. कीर्तांगळी येथे झालेल्या बैठकीत सरपंच परिषदेची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. प्रारंभी तालुक्यातील सहा गटातील १३ सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या चार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. - ..अशी आहे कार्यकारिणी सदस्यपदी शिवड्याचे सरपंच प्रभाकर हारक, कुंदेवाडीचे सरपंच रतन नाठे, सरदवाडीच्या सरपंच रत्ना शिरसाट, जायगावच्या सरपंच शालिनी दौंड, शहाच्या सरपंच शुभांगी जाधव, खडांगळीच्या सरपंच शीला कोकाटे, पिंपरवाडीचे सरपंच विजय गायकवाड, धोंडवीरनगरचे सरपंच शिवाजी सोनवणे, कासारवाडीचे सरपंच सुनील सांगळे आदींची निवड करण्यात आली. ------------------ (१५ योगेश घोटेकर), (१५ मंजुश्री घोटेकर)

150721\004115nsk_12_15072021_13.jpg

१५ योगेश घोटेकर, १५ मंजूश्री घोटेकर

Web Title: Yogesh Ghotekar as the taluka president of Sarpanch Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.