कोरोना रुग्णांच्या वाढीने येवलेकरांच्या उरात धडकीडोकेदुखी ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:24 IST2020-07-04T21:11:38+5:302020-07-04T23:24:28+5:30
येवला : शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठीची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील २५ अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या वाढीने येवलेकरांच्या उरात धडकीडोकेदुखी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठीची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील २५ अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यातील भाटगाव, देशमाने, नागडे, सोमठाण देश, मातुलठाण आदी गावांमध्ये कोरोनाचा नव्याने शिरकाव झाला आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांनी शंभरी ओलांडली असून, सद्यस्थितीला १६६ रुग्ण बाधित आहेत. यापैकी आजपर्यंत १०२ बाधित कोरोनामुक्त झाले असून, तालुक्यात कोरोनाबळींची संख्या ११ झाली आहे. प्रशासनासह आरोग्य विभाग कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरी तालुक्याचा रिकव्हरी रेट ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगितले. दिवसेंदिवस येवला शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मनमाडला १५ नवे रूग्ण
मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून शनिवारी आलेल्या अहवालात पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहरातील एकाच भागातील तेरा तर अन्य भागातील दोन जणांचा समावेश आहे.
शहरात कोरोनाचे आजपर्यंत ८६ रु ग्ण आढळून आले असल्याने शहराची वाटचाल हॉटस्पॉट च्या दिशेने सुरू झाली आहे.येथील ५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३१ रु ग्णांवर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहे.शहरात नगरपालिका प्रशासनासह पोलीस व आरोग्य यंत्रणेने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पडणे गरजेचे असल्याचे मत शहरवासीयां कडून व्यक्त केले जात आहे. याबरोबरच शहरात आरोग्य विभागाने सर्व्हे करावा, पालिकेने कंटेन्मेंट झोन तयार करून नियमांचे कठोर पालन करावे, महसूल यंत्रणेने यावर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.