हॉ, मुझे याद आ रहीं थी...!
By Admin | Updated: December 5, 2015 23:43 IST2015-12-05T23:42:50+5:302015-12-05T23:43:18+5:30
हॉ, मुझे याद आ रहीं थी...!

हॉ, मुझे याद आ रहीं थी...!
नाशिक : ‘नंदिनी’चे सहा महिन्यांपूर्वी अपहरण झाले होते. मे महिन्यात शुक्रवारी अपहरण झालेली नंदिनी शुक्रवारीच (दि.४) आढळून आली. यावेळी नंदिनीचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. यावेळी मोठ्या बहिणींनी उंबरठ्यावर आकर्षक रांगोळी काढून इंग्रजीत तिचे नावही लिहिले होते. सर्वत्र पणत्या प्रज्वलित करण्यात आल्याने आंगण उजळून निघाले होते. जणू नंदिनीच्या रूपाने घरी परतणाऱ्या ‘लक्ष्मी’चे पूजन करत शर्मा कुटुंबीयांनी शुक्रवारच्या संध्येला दिवाळी साजरी केली. शनिवारी (दि.५) नंदिनीची भेट घेतल्यानंतर त्या निरागस चिमुकलीने खोडकरपणे मात्र चाणाक्षबुद्धीने प्रश्नांची मजेदार उत्तरे दिली. ‘हॉ, मुझे याद आ रहीं थी...’ असे सांगायला ती विसरली नाही.