येवला पालिकेतर्फे भ्रमणध्वनी मनोरा सील
By Admin | Updated: March 23, 2017 22:41 IST2017-03-23T22:41:12+5:302017-03-23T22:41:29+5:30
येवला : नगरपालिकेने सध्या करवसुलीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सक्त करवसुलीचा भाग म्हणून शहरातील दोन भ्रमणध्वनी मनोरे वसुली पथकाने सील केले आहेत.

येवला पालिकेतर्फे भ्रमणध्वनी मनोरा सील
येवला : नगरपालिकेने सध्या करवसुलीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सक्त करवसुलीचा भाग म्हणून शहरातील दोन भ्रमणध्वनी मनोरे वसुली पथकाने सील केले आहेत.
देवीखुंट भागात शैलेश लाड यांच्या इमारतीवर असलेले भ्रमणध्वनी मनोरे ३ लाख ६९ हजार ५३९ इतकी, तर शाह कॉलनी भागातील भ्रमणध्वनी मनोऱ्यांकडे १ लाख १४ हजार २२० इतकी थकबाकी असल्याने संबंधित कंपनीस बिल व नोटिसा देऊनही त्यांनी मालमत्ता कराची रक्कम न भरल्याने अखेर दोन्ही मनोरे नगरपालिकेच्या वसुली पथकाने सील केले असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. या कारवाईत उपमुख्याधिकारी आर.आय. शेख, अरु ण गरु ड, विजय शिंदे, अभितोष सांगळे, सत्यवान गायकवाड, आर.डी. पाटील, उदय परदेशी, नारायण कोटमे, वीरेंद्र परदेशी, रवींद्र नागपुरे आदि कर्मचारी सहभागी झाले होते.