येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर

By Admin | Updated: July 6, 2014 00:20 IST2014-07-05T22:10:54+5:302014-07-06T00:20:19+5:30

येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर

In Yeola, the onion market is stable | येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर

येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर

 

येवला : येथील येवला व अंदरसूल कांदा बाजारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावही स्थिर राहिले.
देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी असली तरी गेल्या आठवड्यात २२,४३१ क्विंटल कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली. यावेळी कांद्याला किमान ६०० रुपये, तर कमाल १९०० रुपये प्रतिक्विंटल होते. अंदरसूल मार्केटवर १५८१४ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथेही कांद्याला किमान ६०० ते २३५० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सरासरी १८०० रुपये क्ंिवटल भाव होता.
दरम्यान, गहू, बाजरी, हरभरा व मक्याची आवक घटली आहे. मक्याचे बाजारभाव वाढले असले तरी गहू-बाजरी, हरभऱ्याचे बाजारभाव स्थिर आहेत. गव्हाची आवक केवळ १२ क्विंटल तर बाजारभाव १४०० ते १६०१ रुपये प्रतिक्विंटल होते. बाजरीचीही आवक १२ क्विंटल होऊन १२०० ते १४७८ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. हरभऱ्याची आवक १९ क्विंटल होऊन १९०० ते २६९९रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळाला. मक्याची आवक १९ क्विंटल असून १२५१ ते १३९४ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

Web Title: In Yeola, the onion market is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.