शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

नाशिक निवडणूक निकाल : छगन भुजबळ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 09:23 IST

Yeola VidhanSabha Election results 2019 येवला (नाशिक)- बिगफाइट म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या येवला मतमदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते व आमदार छगन भुजबळ पहिल्या फेरीअखेर पहिल्या फेरीअखेर २४९३ मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांचे पूत्र पंकज भुजबळ मात्र नांदगाव मतदारसंघातून सुमारे ४६०० मतांनी पिछाडीवर आहे.

येवला (नाशिक)- बिगफाइट म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या येवला मतमदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते व आमदार छगन भुजबळ पहिल्या फेरीअखेर पहिल्या फेरीअखेर २४९३ मतांनी आघाडीवर आहेत.येवला मतदारसंघात सन २००४ पासून गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेने राष्टÑवादीतील हेविवेट नेते म्हणून छगन भुजबळ यांना संधी दिली आहे.राष्ट्रवादीचा प्रभाव नसताना केवळ भुजबळ यांच्या विकासाचे कार्ड सतत १५ वर्षे जनतेने उचलून धरले आहे. विकासाच्या मुद्द्यावर गेल्या तीन निवडणुका लढल्या गेल्या. यंदा मात्र तालुक्यात भूमिपुत्राचा मुद्दा प्रकर्षाने विरोधकांनी पुढे आणला आहे. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील बंडखोरी टळली. यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीसह उर्वरित अपक्ष उमेदवारांची फारशी चर्चा नाही. विरोधी नेते भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून एकवटले आहेत. अशा परिस्थितीत हट्ट्रिक साधणारे आमदार छगन भुजबळ यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर येवल्याचा राजकीय रंग काहीसा बदलला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पंचायत समिती आता सेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेत सेनेचे तीन सदस्य आहेत, तर राष्ट्रवादीचे केवळ दोन सदस्य आहेत. गेल्या विधानसभेला भुजबळांच्या पाठीशी सारे नेते होते. यावेळी मात्र दोन्ही दराडे बंधू सेनेचे आमदार झाले आहेत. भुजबळ समर्थक माणिकराव शिंदे यांनी सेनेचा प्रचार केला. संभाजी पवार आणि मारोतराव पवार यांची दिलजमाई झाली आहे. हे सर्व भुजबळ यांच्या विकासाच्या मुद्द्याला आव्हान देणार काय, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. सध्या भुजबळांच्या साथीला १५ वर्षांत केलेला विकास आणि सहकार नेते अंबादास बनकर व त्यांच्या फळीची साथ तसेच सुप्तावस्थेतील सर्वसामान्य, या तीन गोष्टी आहेत. तालुक्यात आपापसातील संघर्ष आणि बेकीच्या राजकारणाचा परिणाम वेळोवेळी निकालात दिसला आहे. या निवडणुकीत सारे भिडू एकत्र आले आहेत. मात्र जनतेच्या मनात असणारा कौल, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी घडणाऱ्या घडामोडी यावर विजयाचे गणित ठरणार आहे. विकास मंदावल्याचा आरोप विरोधक करत असले तरी भुजबळांचे मात्र यंदाही विकासाचे कार्ड पुन्हा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. मागील तीन निवडणुकांपासून या मतदारसंघावर राष्टÑवादी कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सत्ता काळात छगन भुजबळ यांनी तालुक्यात केलेली विकासकामे दिसून येत असल्याने या निवडणुकीतही तालुक्याचा विकास हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुका मोठ्या फरकाने भुजबळ यांनी जिंकल्या आहेत. यंदा भुजबळांची साथ काही लोकांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावर सोडली असली तरी हा मुद्दा विकासाच्या मुद्द्यापुढे कितपत तग धरू शकेल याबाबतही उत्सुकता वाढली आहे. पैठणी ही येवला तालुक्याची ओळख असली तरी कृषिप्रधान असलेल्या या तालुक्यात शेतीच्या अर्थकारणावरच तालुक्याची बाजारपेठ अवलंबून आहे. शेतमालाच्या दरात थोडी जरी चढ-उतार झाली तरी त्याचा तत्काळ बाजारपेठेवर परिणाम होत असतो. त्याचेही पडसाद पाहणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :yevla-acयेवलाNashikनाशिक