येवला नगराध्यक्षांच्या बंधूंचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:17 IST2018-10-10T00:16:17+5:302018-10-10T00:17:04+5:30
येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

येवला नगराध्यक्षांच्या बंधूंचा स्वाइन फ्लूने मृत्यू
येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर क्षीरसागर यांना पंधरा दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र औषोधपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी (दि.९) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुली, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. येवल्यातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने शहरावर शोककळा पसरली. येवला शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. येवल्याचा आठवडे बाजारदेखील ठप्प होता. त्यांच्या अंत्यविधीस शहरासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येवला शहर व तालुक्यात स्वाइन फ्लूमुळे गेल्या पंधरवड्यात ४ रु ग्ण दगावल्याची माहिती आहे. रोगाला निमंत्रण देणारी अस्वच्छता कायमची हद्दपार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना डॉ. किशोर पहिलवान, माजी आमदार मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, आमदार किशोर दराडे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजलीप्रसंगी व्यक्त केली.