येवला : नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा न्यूबा पुरस्कार येवला मर्चंट को-आॅप. बँकेला मिळाला. केरळमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नॅपकॅपचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन पंकज पारख व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. ठेवी व ठेवीच्या प्रमाणात कर्जे थकबाकी संबंधात विवेचन करून उत्कृष्ट बँकेला पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा ७५ कोटी ते १५० कोटी ठेवी असलेल्या बँकाच्या गटातून येवला मर्चंट को-आॅप. बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात अभ्यासपूर्ण भाषणे व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सेमिनारचे उद्घाटन सायबर गुन्हे तज्ज्ञ अभ्यासक रक्षित टंडन व अर्थक्र ांतीचे संस्थापक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सेमिनारचे संयोजक अजय ब्रह्मेचा, शशीताई आहिरे, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे हे उपस्थित होते. या सेमिनारमध्ये सायबर क्र ाइमचे अभ्यासक व संशोधक रक्षित टंडन यांनी बँकांमध्ये कशा पद्धतीने सायबर गुन्हे घडतात. एटीएम ग्राहकधारकांनी कशापद्धतीने सुरक्षा घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केले. नॅशनल अर्बन बँक्स फेडरेशन अध्यक्ष व कॉसमॉस बँकेचे संस्थापक मुकुंद अभ्यंकर यांनी नागरी सहकारी बँका व रिझर्व्ह बँकेचे त्याबाबतीत असलेली धोरणे यांचा ऊहापोह करून नागरी सहकारी बँका मोठ्या प्रमाणावर सशक्त व्हाव्यात यासाठीच्या उपाययोजना भाषणातून सुचवल्या. या कार्यक्र मात येवल्याचे सुपुत्र व इंडियन नेव्हीचे सेवानिवृत्त कमांडर रमेश विश्वनाथ पटेल यांचा नॅपकॅपचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, असोसिएशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. येमकोचे संचालक धनंजय कुलकर्णी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल असोसिएशनचे आभार मानले. यावेळी बँकेचे व्हाइस चेअरमन राजेश भांडगे, संचालक सुशील गुजराथी, हर्षाबेन पटेल, पद्मावती शिंदे, बापू काळे, डॉ. यशवंत खांगटे, मनोज दिवटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
येवला मर्चण्ट्स बॅँकेला पुरस्कार
By admin | Updated: January 23, 2016 22:56 IST